हळदी कुंकू समारंभ थोडे वेगळे पणाने साजरे व्हावेत

निवडणुकांच्या तोंडावर हळदी कुंकू समारंभांचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न सर्वत्र केला जातोय. जवळपास सर्वच प्रभागांमध्ये राजकीय नेतेमंडळी अशा हळदी कुंकू समारंभांचे आयोजन करून शक्ती प्रदर्शन करत आहेत. प्रभागातील आपली ताकद आजमावण्यासाठी व वरिष्ठ नेत्यांना गर्दीद्वारे खुश करण्यासाठी अशा कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते, कुंकवाचे वाण म्हणून चांगल्या भेटवस्तू महिलांना वाटप केल्या जातात, मनोरंजनासाठी सांस्कृतिक व खेळांचे विविध कार्यक्रम या समारंभात आयोजित केले जातात. यामागील हेतू केवळ राजकीय इप्सित साध्य करण्याचा असतो. तसेही आजकालचे गणेशोत्सव, नवरात्री, दहीहंडी यासारखे सणदेखील राजकीय अजेंड्याविणा साजरे होत नाहीत. त्यामुळे हळदी कुंकवासारख्या महिलांच्या समारंभातदेखील राजकारण नसते घुसले तरच नवल. मात्र हळदी कुंकु समारंभांचा राजकीय वापर करत असताना त्यामध्ये विधवा, दुर्बल, अपंग महिला, शहीद स्वातंत्र्य सौनिकांच्या पत्नी, पीडित,  अनाथ मुली यांसह विविध क्षेत्रांत आपल्या कला कौशल्याने विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या महिलांना गौरवले गेले तर असे हळदी कुंकू समारंभ विशेष लक्षात राहतील व प्रेरणादायी ठरतील. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त