कोरोना लस : शंकाकुशंकांचे आव्हान

बहुचर्चित कोविड लसीचे अगमन झाले आहे. हळूहळू सर्वांपर्यंत ही लस पोहोचणार आहे. त्‍यामुळे लवकर लस मिळायला हवी हा अटटाहास सध्‍यातरी कमी आहे. मात्र अजुनही लोकांच्‍या व फ्रंट लाईन वर्कर्सच्‍या मनामध्‍ये काही प्रमाणात या लसीबाबतचा संभ्रम कायम आहे. लसीकरणाचे प्रमाण  जगामधील इतर देशांच्‍या तुलनेत भारतात लक्षणीय असले तरी लसीबाबतच्‍या शंकाकुशंका कमी करण्‍याचे आव्‍हान अजुनही कायम आहे. कोणतीही लस म्‍हटली काही अंशी तीचे दुष्‍परिणाम हे जाणवत असतातच. १०० टक्‍के परिणामकारक व दुष्‍परीणामरहित लस कोणतीही नाही. आजवर देशभरात लक्षावधी लोकांना कोरोना प्रतिबंधासाठी कोविशिल्‍ड अथवा कोव्‍हॅक्‍सीन देण्‍यात आलेले आहे. मात्र त्‍या तुलनेत फार मोठे दुष्‍परिणाम या लसीचे जाणवुन आलेले नाहीत. सध्‍या केवळ सिरम व भारत बायोटेक या दोन कंपन्‍यांंच्‍या लसी सरकारमार्फत देण्‍यात येत आहेत. येत्‍या काही महिन्‍यांत अजुनही काही कंपन्‍यांच्‍या लसी बाजारात येणार आहेत. त्‍यानंंतर लसीची सुरक्षितता ढळु शकते. मात्र सध्‍या देण्‍यात येत असलेल्‍या लसीचे गंभीर दुष्‍परिणाम कुठेही दिसुन न आल्‍यामुळे ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असेच म्‍हणावे लागेल. कोविड सारख्‍या महाभयंकर आजाराचा मुकाबला करण्‍यासाठी गेले वर्षभर विविध प्रतिबंधात्‍मक औषधोपचारांचा भडीमार करण्‍यात आलेला आहे. कोरोनाचा कहर अदयाप संपलेला नाही. प्रत्‍येकाला लस उपलब्‍ध होत नाही तोवर निश्‍चींत राहून चालणार नाही. मास्‍क, सोशल डिस्‍टंन्‍सीग, व्‍यक्‍तीगत स्‍वच्‍छता यासारख्‍या साधनांचा वापर सातत्‍याने करावाच लागणार आहे. नागरिकांसाठी लस मोफत उपलब्‍ध करुन देण्‍यापेक्षा बाजारात त्‍याची वाजवी दराने विक्री करण्‍यास परवानगी देण्‍यास हरकत नाही जेणेकरुन उच्‍चभ्रु व सधन घटक लस विनासायास खरेदी करु शकतील. कोरोनाची भिती कायमची संपवण्‍यासाठी भविष्‍यात नियमित लसीकरण कार्यक्रमात या लसीचा अंतर्भाव करण्‍याचा विचार होऊ शकतो. लसीची परिणामकारता मोजण्‍यापेक्षा कोरानाची भिती मनातून घालवण्‍यासाठी या लसीचा प्रभावी वापर करुन घेणे श्रेयस्‍कर आहे.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई    


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त