हे लोक रेल्वे परिसरात येतातच कसे

लोकल रेल्वे स्थानके व डब्यांमध्ये पुन्हा एकदा भुरटे चोर, भिकारी, फेरीवाले व तृतीयपंथीयांचा वावर वाढत चालला आहे. हे लोक बिनदिक्कतपणे प्रवाशांच्या अंगाला हात लावून पैशांची मागणी करतात. त्यांना प्रतिबंध करणारी कोणतीही यंत्रणा रेल्वेकडे सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन व त्यांच्यात कुठेतरी साटेलोटे असल्याचा संशयदेखील येतो.   हे भुरटे चोर व फेरीवाले कुणाच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे रेल्वे परिसरात वावरत असतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न कुणीच करत नाही. ठराविक लोक अशा प्रकारचे कृत्य करत असताना रेल्वे स्थानकांमध्ये दररोज प्रवेश करतातच कसे हा मोठा प्रश्न पडतो. रेल्वे स्थानकांमध्ये पोलीस व सीसीटीव्ही सारख्या यंत्रणा कार्यान्वित असतानादेखील मोठ्या हिंमतीने हे लोक स्थानकांमध्ये घुसतात व आपला कार्यभार साधण्याचा प्रयत्न करतात. रेल्वे डब्यांमध्ये लहान लहान मुलांकडून सर्रास भीक मागितली जाते. अशा मुलांना बालसुधागृहात भरती केले पाहिजे. सध्या रेल्वे मधील गर्दी वाढत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन चोरीसारखे प्रकार करण्याचे धाडस होत असून रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा लोकांवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. त्यांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न अपेक्षित आहेत. मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुखकर व सुरक्षित करण्यासाठी रेल्वे स्थानकांत विनाकारण फिरणारे लोक , गर्दुल्ले, भिकारी, तृतीयपंथी, संशयित व्यक्ती, फेरीवाले, चोर यांना आळा घालणे तितकेच गरजेचे आहे. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त