हे धुके नव्हे तर प्रदूषण

एमआयडीसीमधील कंपन्यांमधून हवेत सोडले जाणारे विषारी गॅस, नवीन बांधकामे, वाहनांमधून निघणारा धूर आदी करणांमुळे नवी मुंबई, पनवेल भागातील प्रदूषणाची पातळी धोक्याच्या वर जाऊन पोहोचली आहे. यासंदर्भात पर्यावरणावर काम करणाऱ्या अनेक संस्थांनी शिक्कामोर्तब केले आहे. हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्याचे दर्शवणारे वस्तुस्थितीदर्शक अहवाल उपलब्ध असले तरी त्यावर नियंत्रणासाठी कोणतेही ठोस प्रयत्न प्रदूषण मंडळाकडून होत नाहीत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एमआयडीसीमधील काही कंपन्या विषारी वायू हवेत सोडत असतात ज्याचा विपरीत परिणाम श्वसनाचा त्रास, अस्थमा, स्मृतीभ्रंश, कॅन्सर, हार्ट अटॅकसारखे आजार यांमध्ये होत आहे. पर्यावरणातील हा प्रदूषित बदल नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांच्या अनुभवास सध्या दररोज येत आहे. सकाळचे दिसणारे धुके हे धुके नसून प्रदूषणाचे कण असल्याचे लक्षात येत असून त्यामुळे लगेच थकवादेखील जाणवत आहे. नवी मुंबईचे वातावरण प्रदूषित करणाऱ्या केमिकल कंपन्या, कन्स्ट्रक्शन साईट व बेसुमार वाहनांवर कुठेतरी निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रदूषण महामंडळ व महानगरपालिका यांनी संयुक्त मोहीम राबवणे गरजेचे आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त