सरकारचा योग्य निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पहिली तो आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय रास्तच आहे. मागील वर्षभर शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी सर्वच मुलांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या 2020-21 हया शैक्षणिक वर्षाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यातच अंतिम परीक्षेच्या वेळेला कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून मागील वर्षीपेक्षा भयंकर लाट सध्या राज्यभर पसरलेली आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या परीक्षा घेणे व त्याचे नियोजन करणे शिक्षक व शाळांसाठी महाकठीण काम आहे. ऑनलाइन परीक्षांना खरे तर अडचण नाही मात्र अनेक मुलांना ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत सहभागी होण्यास निर्माण झालेल्या अडचणी पाहता काही मुले ऑनलाईन परिक्षांपासून वंचीत राहण्याची शक्यता आहेच. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विदयार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय स्वागतार्ह आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा एकतर पुढे ढकलाव्यात किंवा ऑनलाइन प्रक्रियेने तरी घ्याव्यात कारण विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारी ही शैक्षणिक वर्षे मूल्यमापनाविना वाया जाणार नाहीत. नववी व अकरावीच्या वर्गांबाबतदेखील योग्य निर्णय लवकर जाहीर करावा.  


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त