अन्यथा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे

रुग्णालयांमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या आग लागण्याच्या घटना नक्कीच चिंताजनक आहेत. नियमित फायर ऑडिटचा अभाव, तांत्रिक उणिवा व मानवी चुका यामुळे ह्या घटना सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये घडताना दिसून येतात. आग प्रतिबंधात्मक उपकरणे असूनदेखील त्या हाताळण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना नसल्यानेदेखील ह्या आगीच्या घटना थांबवता येत नाहीत. जुनी उपकरणे, त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत दाखवलेला निष्काळजीपणा याचा परिपाक आगीच्या घटनांमध्ये होतो. त्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने आपापल्या अग्निशामक यंत्रणेच्या माध्यमातून रुग्णालयासारख्या संवेदनशील वास्तूंचा आगप्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने नियमित आढावा घ्यावा. त्यात उणिवा आढळून आल्यास त्या रुग्णालयाचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे व जोवर आगीच्या दृष्टीने ती इमारत सुरक्षित होत नाही तोवर वापरास परवानगी देऊ नये. आगीच्या घटनांमध्ये जाणारे निष्पाप जीव वाचवण्यासाठी ठोस प्रयत्न येत्या काळात करावेच लागतील. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त