देवमाणूस समारोपाकडे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
देवमाणूस ही झी मराठीवरील मालिका एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. गेली कित्येक महिने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ह्या मालिकेचा शेवट कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्य घटनेवर आधारित ही मालिका काहीशी भरकटत चाललेली असल्यामुळे मालिकेच्या काही अवास्तव भागांमुळे तिच्यावर बरीचशी टिकादेखील झाली. मात्र लवकरच या मालिकेतील बोगस डॉक्टरचा पर्दापाश होऊन हा डॉक्टर दिव्या सिंगच्या ताब्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिव्याला डॉक्टरविरोधात बरेचसे पुरावे मिळाले असल्याने डॉक्टरच खरा देवीसिंग आहे आणि गावात घडणाऱ्या घटनांमागे त्याचाच हात आहे हे आता तिच्या लक्षात आले आहे. देवमाणूस मालिकेत एकीकडे दिव्या सिंगचा सुरू असलेला तपास तर दुसरीकडे डिंपल आणि डॉक्टर अजितच्या लग्नाची लगबग या दोन्ही गोष्टी वेग घेताना दिसत आहेत. डिंपल आणि डॉक्टरच्या या लग्नाच्या सोहळ्यातच दिव्या सिंग डॉक्टरला अटक होणार असल्याचे प्रोमोद्वारे लक्षात येत आहे. त्यामुळे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. एवढे दिवस मालिकेतील सरू आज्जी, टोण्या, डिंपल ,बज्या, नाम्या, या सर्वांच्या अभिनयाने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले होते मात्र आता मालिका निरोप घेणार म्हटल्यावर अनेक चाहते काहीसे नाराज झालेले आहेत. मात्र सत्यकथानकावर आधारित मालिकेत नको त्या कथाबाह्य घटना घुसवल्या की त्यातील बोध निघून जातो व केवळ मनोरंजन शिल्लक राहते. देवमाणूसच्या बाबतीत होत असलेली तीच समजूत पुसून टाकण्यात मालिकेचे लेखक किती यशस्वी होतात हे ह्या मालिकेचे उरलेले भाग पाहिल्यावरच कळेल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment