लोकांच्या आरोग्याशी खेळ

लॉकडाऊन काळात बहुतांश उद्योग व्यवसायांवर सरकारने निर्बंध आणल्यामुळे सर्व परवानग्या घेऊन सरकारी नियमांचे पालन करून व्यवसाय करणारे बहुतांश उद्योग व्यवसाय प्रचंड अडचणीत आले आहेत. मात्र या संकटात संधी शोधत रस्ते, पदपथ जिथे सोयीची जागा मिळेल तिथे फेरीवाले आपले बस्तान बसवत अनधिकृतरित्या व्यवसाय करताना दिसत आहेत. यात भाजीपाला, फळविक्रेते, मच्छीविक्रेते यांची संख्या मोठी आहे. एकीकडे अधिकृत व्यवसाय करणारी दुकाने बंद व दुसरीकडे फेरीवाल्यांचा सर्वत्र मुक्त संचार अशी परिस्थिती सगळीकडे आहे. लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास बंद आहे मात्र फेरीवाले राजरोसपणे तिकीट तपासनीस व रेल्वे पोलिसांसमोर रेल्वे डब्यांमध्ये आपला व्यवसाय करताना दिसतात. या फेरीवाल्यांमध्ये बहुतेक फेरीवाले परप्रांतीय असून ते दररोज अनेक लोकांच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे त्यांची कोरोना तपासणी करणेदेखील क्रमप्राप्त ठरते जे अजिबात घडताना दिसत नाही. तसेच फेरीवाल्यांकडे मिळणाऱ्या वस्तूंची विश्वासार्हता व गुणवत्ता तपासणारी यंत्रणादेखील उपलब्ध नसल्याने त्यांना मिळणारी मुभा लोकांच्या आरोग्याशी खेळ नाही का?



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर