निर्बंधातून सूट सरकारने दिलीय, कोरोनाने नाही

कोविड साथ बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. रुग्णसंख्यादेखील उतरतीकडे चालली आहे. त्यामुळे हळूहळू सर्वच व्यवहार सुरू होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र सरकारने दैनंदिन व्यवहारांना परवानगी दिलेली असली तरी कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. लोकांचा निष्काळजीपणा हा पुन्हा एकदा संसर्गवाढीला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे सर्व गोष्टी सुरू झाल्या तरी प्रवास, बाजारपेठा, सभा व इतर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी अनेकांच्या जीवावर बेतणारी ठरू शकते. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्स व स्वच्छता ह्या बाबी कटाक्षाने पाळायलाच हव्यात. येत्या काही दिवसांत तिसऱ्या लाटेचीदेखील शक्यता वर्तवलेली असल्यामुळे मिळालेली मोकळीक जरा जपूनच वापरावी लागणार आहे. अतिआत्मविश्वास व निष्काळजीपणा आपल्यासह अनेकांच्या जीवावर बेतू शकतो. लसीकरण झाल्यानंतरदेखील कोविडचा संसर्ग संभवत असल्याने लस घेतल्यानंतर येणारा निर्धास्तपणाही टाळला पाहिजे. गर्दीची ठिकाणे टाळणे व सदासर्वदा मास्कचा वापर केला पाहिजे. कोरोना पुन्हा कधीही डोके वर काढू शकतो. निर्बंधातून सूट सरकारने दिलीय कोरोनाने नाही एव्हढे ध्यानात ठेवा! 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त