दिसावे तेल चित्र नवे

दिसावे तेल चित्र नवे हा अग्रलेख(दै लोकसत्ता 16 जून) वाचला. सध्या भारतीय बाजारपेठांमध्ये कधी नव्हे इतक्या वाढलेल्या तेलाच्या किंमतींची कारणमीमांसा करणारा सदर लेख आहे. खाद्यतेलांच्या किमतींमध्ये दरवर्षी पाच ते दहा टक्के वाढ दरवर्षी होते मात्र यंदा झालेली साठ ते सत्तर वाढ सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन बजेट कोलमडवणारी आहे. खाद्यतेल हा रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अशा वस्तूंच्या दरात झालेली वाढ लोकांच्या आर्थिक बाजूवर थेट प्रहार करते. मात्र अशा पद्धतीने दैनंदिन जीवनातील अविभाज्य वस्तूंची दरवाढ करण्याचा विडाच सरकारने उचलल्याचे दिसून येत आहे. खाद्यतेलासारख्या ज्या वस्तूंची सर्वाधिक आयात आपल्याला परदेशांमधून करावी लागते त्यांच्या बाबतीत स्वावलंबन मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक प्रयत्न का झाले नाहीत हा मोठा प्रश्नच आहे. खाद्यतेलाची तेलनिर्मिती हा कृषिक्षेत्राशी निगडित विषय व भारतासारख्या कृषिप्रधान देशात खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत असेल तर देशाचे कृषिधोरण पुन्हा पडताळावे लागेल. राहिला प्रश्न साठेबाजीचा तर साठेबाजी रोखण्यासाठीदेखील ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. तेलाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आयातीवरील शुल्क केंद्र सरकार कमी करेल अशी आशा ठेवून बंदरांवरील गोदामात १५ लाख टन खाद्यतेल साठवून ठेवले असेल तर सरकार त्याची दखल का घेत नाही हाही प्रश्न आहेच. तेलंगणा राज्याने सुर्यफुलाचे घटते उत्पादन पाहता त्या उत्पादनाला हमीभाव देण्याचा निर्णय घेतला तोच निर्णय देशातील सर्वच खाद्यतेल उत्पादनांच्या बाबतीत  घ्यायला हवा कारण खाद्यतेल ही प्रत्येकाची अनिवार्य गरज आहे व त्याचे वाढते दर देशाचे व लोकांचे "अर्थ"स्वास्थ्य बिघडवणारे ठरतील. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर