हा न्यूनगंड अपरिहार्यच

बळे बळे....स्वबळे हे संपादकीय (दै लोकसत्ता 22 जून) वाचले. काँग्रेस हा पक्ष राज्यात व केंद्रातील सत्तेत तसा नावापूरताच उरलेला आहे. नवे कार्यकर्ते जोडण्यात किंवा पक्षउभारणीसाठी म्हणावा तितका वेळ खर्ची करताना काँग्रेस नेतेदेखील दिसत नाहीत. राज्यातील काँग्रेसची परिस्थिती अत्यंत विदारक असताना प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या दररोजच्या मेघागर्जना काँग्रेसला सध्या वलयांकित करत आहेत. काँग्रेसने गेल्या कित्येक वर्षांत आक्रमकता वापरलेली नाही. पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्यंतरी निवडणूक काळात ही आक्रमकता दाखवली खरी पण ती फक्त भाजपवर टीका करण्यापूरती. अशा परिस्थितीत सध्या महाराष्ट्रात नानाभाऊ दाखवत असलेली आक्रमकता कामी येताना दिसत आहे. मग महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर दबाव आणण्यासाठी असो की कार्यकर्त्यांना नवी उभारी देण्यासाठी. या ना त्या कारणावरून कधी नव्हे इतकी काँग्रेस व नानाभाऊंची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर दिसते. सध्याच्या डिजिटल व गतिमान युगात नवे मतदार व कार्यकर्ते आकर्षित करायचे असतील तर हा 'न्यूनगंड' अपरिहार्यच ठरतो. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त