फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण हवे

लॉकडाऊन काळात बहुतांश उद्योग व्यवसायांवर सरकारने निर्बंध आणल्यामुळे बाजारपेठा बंद आहेत. याचा फायदा घेत रस्ते, पदपथ जिथे सोयीची जागा मिळेल तिथे फेरीवाले आपले बस्तान बसवत व्यवसाय करताना दिसत आहेत. यात भाजीपाला, फळविक्रेते, मच्छीविक्रेते यांची संख्या मोठी आहे. एकीकडे अधिकृत व्यवसाय करणारी दुकाने बंद व दुसरीकडे फेरीवाल्यांचा सर्वत्र मुक्त संचार अशी परिस्थिती सगळीकडे आहे. लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास बंद आहे मात्र फेरीवाले राजरोसपणे तिकीट तपासनीस व रेल्वे पोलिसांसमोर रेल्वे डब्यांमध्ये आपला व्यवसाय करताना दिसतात. या फेरीवाल्यांमध्ये बहुतेक फेरीवाले परप्रांतीय असून ते दररोज अनेक लोकांच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे त्यांची कोरोना तपासणी करणेदेखील क्रमप्राप्त ठरते. तसेच फेरीवाल्यांकडे मिळणाऱ्या वस्तूंची विश्वासार्हता व गुणवत्ता तपासणारी यंत्रणादेखील उपलब्ध नसल्याने त्यांना मिळणारी मुभा लोकांच्या आरोग्याशी खेळ नाही का? 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त