लस घेतली तरच लोकलप्रवास
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
मुंबई उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. उपनगरांतील चाकरमान्यांना मुंबईकडे प्रवास करताना होणारा त्रास पाहता ही मागणी खरेतर रास्तच आहे मात्र लोकलमधील भरमसाठ गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका पाहता सरकार रेल्वे प्रवास खुला करण्यास फारसे अनुकूल नाही. मात्र विविध संस्था, संघटना व प्रवाशांकडून वाढता दबाव पाहता व रेल्वे प्रशासनाचे होत असलेले आर्थिक नुकसान पाहता येत्या काही दिवसांत काळात लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करणे अपरिहार्य आहे. मात्र यासाठी प्रवाशांचे लसीकरण ही अत्यंत महत्वाची बाब आहे. कोविडची लस घेतली असेल तरच लोकलप्रवासासाठी अनुमती देण्यात यावी. यासाठी तिकीट देताना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात यावे. लस घेतलेली व्यक्ती बऱ्याच प्रमाणात संसर्गापासून सुरक्षित ठरते. त्यामुळे अशा व्यक्तीलाच लोकलसारख्या सार्वजनिक प्रवासात संधी देणे इष्ट ठरेल. हीच बाब मेट्रो व लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीदेखील लागू करण्यात यावी. यामुळे लसीकरणाचे प्रमाणदेखील वाढेल व लसीबाबत अधिकाधिक जनजागृती निर्माण होईल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment