गणेशोत्सवात थोडी मोकळीक द्या
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
श्रीगणेश हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. कुठल्याही शुभकार्याची किंवा चांगल्या गोष्टीची सुरुवात गणेशाच्या आराधनेने करण्यात येते. गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात फार मोठ्या उत्साहात, जल्लोषात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. वर्षभर आपले दैनंदिन काम करण्याची ऊर्जा ह्या उत्सवातून भक्तांना मिळते. मात्र कोरोना प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून गणेशोत्सवासहित सर्वच सणांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. यंदा हा उत्सव दीड महिन्यांवर येऊन ठेपला आहे व सरकारने पुन्हा एकदा या उत्सवावर कडक निर्बंध घातले आहेत. वास्तविक कोरोनाशी गेले वर्ष दीड वर्ष मुकाबला करत असताना लोकांमध्ये आवश्यक काळजी घेण्याबाबतची जागरुकता नक्कीच निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात फार मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करतील असे चित्र सध्यातरी दिसत नाहीत. गणेशमूर्तींची उंची कमी करण्यामागील लॉजिक तर समजतच नाही. शाडूची मूर्ती वापरण्याचे केलेले आवाहन पर्यावरणाच्या दृष्टीने ठीक आहे. मिरवणूका काढल्या तरी त्यावर गर्दीसाठी निर्बंध घालता येतील. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावनांशी निगडित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांना थोडी मोकळीक देण्यास हरकत नाही असे वाटते. महाराष्ट्र व देशावर घोंगावत असलेले कोरोनाचे गंभीर सावट दूर करण्यासाठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य या गणेशोत्सवातून घडो हीच अपेक्षा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment