अधिकाधिक पदके जिंकण्याची अपेक्षा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
जपानमध्ये एकीकडे कोव्हिडशी संघर्ष सुरु आहे, तर दुसरीकडे टोकियोमध्ये २३ जुलैपासून आंतराष्ट्रीय प्रतिष्ठेची ऑलिंम्पिक स्पर्धा सुरू होणार आहे. टोकियोमध्ये मुळात 2020 मध्ये ऑलिम्पिक होणार होतं. पण कोव्हिड 19च्या जागतिक साथीमुळे ते वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलं. आता 2021 वर्षात हे ऑलिंपिक जपानची राजधानी टोकियोमध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये 33 स्पर्धा आणि 339 इव्हेंट्स असतील आणि 42 ठिकाणी त्या पार पडतील. ऑलिंपिक स्पर्धा जवळ येत असतानाच जपानची राजधानी टोकियोमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आल्यामुळे या स्पर्धा प्रेक्षकांविना होणार आहेत. ही स्पर्धा आंतराष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते. भारताचे १२६ खेळाडू खेळांच्या विविध १८ प्रकारांमध्ये सहभागी होत असून त्यांच्याकडून देशवासियांना मोठ्या अपेक्षा आहेत. या स्पर्धेत खेळाडू निवडताना त्या त्या खेळातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड ऑलिम्पिक साठी होत असते. गेल्या काही वर्षांत भारताची या स्पर्धांमधील यशस्वी कामगिरी पाहता यंदादेखील अधिकाधिक पदके जिंकण्याच्या खेळाडूंकडून अपेक्षा आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना सराव व फिटनेससाठी पोषक वातावरण उपलब्ध झालेले नसले तरी भारतीय खेळाडू हे जिद्द व चिकाटीसाठी ओळखले जातात. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचा वरचष्मा राखण्यासाठी खेळाडूंकडून सर्वतोपरी योगदानाची आशा आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment