भटक्या कुत्र्यांना आवरा

नवी मुंबईमध्ये सर्वत्र भटक्‍या कुत्र्यांनी अक्षरश उच्‍छाद मांडलेला आहे. दिवसरात्र या कुत्र्यांचा रस्त्यांवर अगदी मुक्त संचार सुरू असतो. झुंडीने फिरणारी ही कुत्री पादचाऱ्यांच्या, दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जातात, जोरजोरात भुंकतात. लहान मुले व वृद्ध व्यक्तींना तर अंतर्गत रस्त्यांवर या कुत्र्यांच्या भीतीपोटी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. भटक्या कुत्र्यांच्या नाहक त्रासामुळे नागरिकांना व दुचाकीस्‍वारांना रात्रीच्‍या वेळी तर बाहेर फिरणेदेखील मुश्किल झाले आहे. पालिका दरवर्षी या भटक्या कुत्र्यांची संख्या व नसबंदी प्रक्रियेबाबत आकडेवारी जाहीर करते.  परंतु रस्‍त्‍यावर मुक्तपणे फिरणारा भटक्‍या कुत्र्यांचा भस्‍मासुर पाहिला पालिकेच्‍या नसबंदी क्रियेबाबत शंका येतेच पण नसबंदी केल्‍यानंतरदेखील या कुत्र्यांचा उपद्रव कमी न झाल्‍याचेच दिसुन येते. नवी मुंबई पालिका हददीमध्‍ये दरवर्षी शेकडो लोकांना श्‍वानदंश होत आहे. रात्रीच्‍या वेळी दुचाकीस्‍वारांच्‍या मागे लागल्‍याने त्‍यांचे होणारे अपघात व नागरिकांना या भटक्‍या कुत्र्यांच्‍या भुंकण्‍याने रात्रीअपरात्री होत असलेला त्रासदेखील असहय झालेला आहे. या भटक्‍या कुत्र्यांची केवळ नसबंदी न करता त्‍यांची रस्‍त्‍यावरील संख्‍या कमी केली गेली पाहिजे. प्रभागांमध्ये ह्या भटक्या कुत्र्यांवरील कारवाईची मोहीम तीव्र करणे आवश्यक आहे. राजरोसपणे रस्त्यांवर मोकाटपणे फिरणाऱ्या या भटक्या कुत्र्यांपासुन त्रस्‍त नवी मुंबईकरांची सुटका करून पालिकेने त्यांना दिलासा दयावा.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई  


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त