रेल्वे फलाटांवर प्रसाधनगृहे असावीत
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतील सिडको निर्मित रेल्वे स्थानकांमध्ये फलाटांवर कुठेही प्रसाधन गृहांची सोय नाही. प्रसाधन गृह गाठण्यासाठी प्रवाशांना थेट स्टेशन बाहेर पडावे लागते. सर्वच स्टेशनच्या बाहेर एका बाजूकडील कोपऱ्यात प्रसाधनगृहे बनवण्यात आलेली आहेत जी प्रवाशांच्या दृष्टीने सोयीस्कर नाहीत. अनेकदा नव्या प्रवाशाला ही प्रसाधन गृह कुठे आहे अशी विचारणा करत ते गाठावे लागते. यात लहान मुले, वृद्ध व महिलांचे प्रचंड हाल होतात. त्यात मोठ्या कुचंबनेला सामोरे जावे लागते. प्रसाधन गृह ही लोकांच्या आयुष्यातील अत्यावश्यक बाब असून नवी मुंबईसारख्या स्वच्छतेच्या बाबतीत भरारी घेणाऱ्या शहरात ती नागरिकांना सहज उपलब्ध व्हायला हवीत. यासाठी या शहरातील रेल्वे स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार होणे गरजेचे असून स्थानकांमधील फलाटांवर किमान एक प्रसाधनगृह तरी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेऊन सर्व स्थानकांमध्ये प्रवाशांना सहज उपलब्ध होतील अशा पद्धतीने प्रसाधन गृहांची व्यवस्था करून स्वच्छ व सुंदर नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवावा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment