योग्य संदेश द्या

झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका १५ ऑगस्ट रोजी निरोप घेणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पोलीस व न्यायालयाला हातोहात फसवत जेलमधून निर्दोष सुटलेला अजित उर्फ देवीसिंग, मालिकेतील नव्या पात्रांमुळे पुन्हा एकदा प्रचंड अडचणीत सापडलेला आहे व त्याचे सर्व गुन्हे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्यघटनेवर आधारित असलेली ही मालिका वास्तविक घटनेपासून अनेकदा भरकटली. त्यामुळे रटाळ तसेच चीड आणणारे अनेक प्रसंग या मालिकेत पाहायला मिळाले. आता देवीसिंग या खुनी पात्राचा अंत करून एक सकारात्मक संदेश या मालिकेतून दिला जाईल अशी अपेक्षा आहे. समाजात असे अनेक बोगस डॉक्टर राजरोस फिरत असून त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भामटेगिरीला देवमाणूस या मालिकेतून 'योग्य' तो संदेश जाईल व गुन्हेगारी कमी होईल अशी आशा करायला हरकत नाही. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा