भामटेगिरीचा अतिरेक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून सरकारी यंत्रणांकडून चुकीच्या मार्गाने आपली कामे करून घेण्याचा झालेला प्रयत्न म्हणजे भामटेगिरीचा अतिरेकच आहे. अशा पद्धतीने राजकीय नेत्यांचे आवाज व नावे वापरून दबाव आणण्याचे प्रयत्न यापूर्वीदेखील झालेले आहेत. मुळात सरकारी कामांमध्ये सुरू असलेली वशिलेबाजी पूर्णपणे थांबली पाहिजे. नियमबाह्य कामांमध्ये बाहेरील हस्तक्षेप, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दूरच ठेवायला हवा. मोठमोठया नावांचा गैरवापर करून साम, दाम, दंड या नीतीने आपले इप्सित साध्य करू पाहणाऱ्या दलालांची कमतरता समाजात नाही. यात बहुतांश प्रकरणी आर्थिक लोभच अधिक प्रमाणात असतो. यात सरकारी यंत्रणांनाही आमिषे दाखवली जातात. मात्र ज्या दिवशी यंत्रणा कुठल्याही आमिषाला बळी न पडता पारदर्शकपणे, नियम व कायद्यानुसार कामे करतील त्या दिवशी हे प्रकार बंद होतील.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त