चीड आणणारी उत्कंठा

झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका अखेरच्या भागात आणखी दोन महिलांचा खून करून अर्धवट अवस्थेत संपवण्यात आली व शेवट पाहण्यासाठी मालिकेचा येऊ घातलेला पुढील सिझन पाहावा लागणार असल्याचे सूतोवाच केले गेले. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली ही मालिका देवमाणूस ह्या खुनी पात्राच्या करामतींनी कमालीची रंगवण्यात आली होती. सत्यघटनेवर आधारित ही मालिका सत्यकथानकापासून पूर्णपणे भरकटली व लेखक दिग्दर्शकांना वाटेल तशी दाखवण्यात आली. त्यामुळे या मालिकेवर टिकादेखील खूप झाली. मालिकेच्या शेवटी तरी बोगस डॉक्टरचा पर्दाफाश होईल व त्याला मोठी शिक्षा होईल ही दर्शकांची अपेक्षादेखील फोल ठरली. एका खेडेगावमध्ये डझनभर खून करून बोगस डॉक्टर असलेला आरोपी जेल, कोर्ट, पोलिसांच्या तावडीतून सहीसलामत सुटल्याचे चित्रण म्हणजे न्यायव्यवस्थेचे एक प्रकारे हननच आहे. मात्र तरीदेखील मालिकेचा शेवट देवीसिंग उर्फ अजित याला शिक्षा होऊन त्याच्यासाठी कडू व प्रेक्षकांसाठी गोड होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यासाठी देखील प्रेक्षकांची वाढवलेली उत्कंठता चीड आणणारी आहे. प्रसिद्धी व टीआरपीचा हा एक प्रकारे गैरवापरच म्हणावा लागेल. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त