उत्सव परंपरा हीच महाराष्ट्राची ओळख

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याने यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची मागणी गोविंदा पथके आणि दहीहंडी आयोजकांनी सरकारकडे केली होती. गेल्या वर्षी काही गणेशोत्सव मंडळांनी करोना नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली होती. त्याच पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी दहीहंडी पथकांची होती. वास्तविक कोरोना इतक्यात समाजातून पूर्णतः नाहीसा होणे अशक्य आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने सर्व व्यवहार, कार्यक्रम, उत्सव बंद ठेवण्याचे दिवस आता उलटले आहेत. लोकांना प्रतिबंधाची बऱ्यापैकी समज आलेली आहे. आरोग्य विभागदेखील तिसऱ्या लाटेची परिस्थिती उद्भवली तर ती हाताळण्यास सुसज्ज आहे. त्यामुळे हळूहळू सणांवरील निर्बंध उठवण्याची वेळ आलेली आहे. कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या गोविंदांना आणि कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी देण्यास हरकत नव्हती. कोरोनाबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी गोविंदा पथके, मंडळे तयार आहेत, त्यांना गर्दी न करता आपल्या विभागात पारंपरिक पद्धतीने व कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी द्यायला हवी. उत्सवावर पूर्णपणे बंदी असू नये, उत्सवांची परंपरा हीच महाराष्ट्राची संस्कृती व ओळख आहे. त्यामुळे लोकांना सण उत्सव कोरोना नियमांचे पालन करून सार्वजनिकरित्या साजरे करू द्यायला हवेत. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा