पोलिसांचा वचक हवा

मागिल रविवारी हाजी मलंग परिसरात कायदा हातात घेत मारहाणीची घडलेली घटना अत्‍यंत निंदनीय आहे. मात्र या घटनेनंतर प्रचंड मारहाण झालेली असतानाही हद्दीचे कारण देऊन संबंधित तरुणांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार देण्‍याचा घडलेला प्रकार त्‍याहुन चिड आणणारा होता. वास्तविक गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलिसांना त्याचवेळी या तरुणांची तक्रार दाखल करून घेत त्यांना सहकार्य करायला हवे होते. शून्य नंबरने इतर पोलिस ठाण्यात गुन्‍हा वर्ग करण्‍याचे प्रावधान असतानादेखील अनेक गंभीर गुन्ह्यात पोलिस टाळाटाळ करतात. विनयभंग व मारहाणीच्‍या हया गंभीर घटनेत चौकीत उपस्थित पोलिसांनी त्यांना सदरचे ठिकाण आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत मेडिकल तपासणी करून दुसऱ्या पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. मारहाणीच्या वेदना सहन होत नसल्याने या तरुणांनी तक्रारीचा नाद सोडत आपल्या भावनांना सोशल मीडियावरून वाट करून दिली. त्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी २४ तासांनंतर गुन्हा दाखल केला. वास्‍ताविक न्‍याय मिळण्‍यासाठी पोलिसांकडून होत असलेल्‍या दिरंगाईमुळे दाद मागण्‍यासाठी पिडीत आपला स्‍वतंत्र मार्ग निवडतात. पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावत ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या उक्‍तीनुसार पिडीतांना न्‍याय देण्‍यासाठी दोषींवर तात्‍काळ कडक कारवाई केली तर समाजातील कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राहील व गुन्‍हेगारांवर वचकदेखील.   

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त