देऊळे म्हणजे नाना शरीरे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
देऊळे म्हणजे नाना शरीरे हे संपादकीय (दै लोकसत्ता १ सप्टेंबर) भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर अचूक बोट ठेवणारे आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता केंद्र शासन सर्व काही तूर्तास उघडू नका असे सांगते तर महाराष्ट्रातील भाजप त्याकडे कानाडोळा करत देवळे उघडण्यासाठी सरकारकडे आग्रह धरते. हा विरोधाभास केवळ राजकीय इच्छाशक्तीतून जन्मलेला आहे हे उघड आहे. वास्तविक राज्यातील कुठल्या गोष्टी सुरू कराव्यात व कुठल्या बंद ठेवाव्यात याचा पूर्ण अधिकार राज्य सरकारचा आहे. मात्र त्या उघडल्यानंतर संभाव्य परिणामांचा विचारदेखील तज्ञांच्या सल्ल्याने करणे क्रमप्राप्त ठरते व तीच भूमिका सध्या राज्य सरकारची दिसते. मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेली त्रेधातिरपीट नेमकी कशासाठी हे लपून राहिलेले नाही. महाराष्ट्र हे धार्मिकतेने व्यापलेले राज्य आहे. अनेक धार्मिक व ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेले महाराष्ट्राची धर्म हीच संस्कृती आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वसलेली मंदिरे हिच राज्याची ओळख व पर्यटनाचादेखील आधारस्तंभ आहेत. या स्थळांवर जाणारी अनेक भाविक पर्यटन व आत्मिक समाधानासाठी तेथे भेटी देतात. त्यामुळे साहजिकच या धार्मिक - पर्यटन स्थळांवर रोजगारासाठी अवलंबुन असलेल्यांची संख्याही लक्षणिय आहे. त्यामुळे धर्मिकतेला नाही तर रोजगाराला तारण्यासाठी तरी कोरोना नियम पाळून देऊळे सुरू करण्याचा विचार व्हायलाच हवा यात दुमत नाही. मात्र केवळ गर्दीचे 'आशीर्वाद' घेण्यासाठी उतावीळ झालेल्यांनी राजकीय कुरघोडीचे ध्येय ठेवून मंदिरे उघडण्याचा अट्टाहास करणे जरा अवाजवीच ठरते.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment