भटक्या कुत्र्यांची दहशत

भटक्या कुत्र्यांच्या उच्छादाबाबत वर्तमानपत्रांमध्ये दररोज बातम्या छापुन येत आहेत. मात्र या गंभीर विषयाबाबत महानगरपालिकांच्या उदासीन धोरणांमुळे मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. सर्व महानगरपालिका व त्यांच्या झोपड़पट्टी क्षेत्रांमधे ह्या कुत्र्यांचा दिवसरात्र वावर असतो. येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांवर भुंकणे, दुचाकीस्वारांच्या मागे लागणे, प्रसंगी चावा घेणे हे प्रकार नित्याचेच झालेत. त्यामुळे नागरिकांना या कुत्र्यांच्या अक्षरशः दहशतीत राहावे फिरावे लागत आहे. महानगरपालिकांनी तातडीने या समस्येकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी जातीने लक्ष् देण्याची गरज आहे. रोज होणारे अपघात, नागरिकांना कुत्रि चावण्याच्या प्रमाणात होणारी वाढ यावरुन तरी प्रशासनाने बोध घेण्याची गरज आहे नाहीतर रस्त्यावर फिरणारा हा भस्मासुर उद्या आपल्या घरापर्यंत पोहोचला तर पश्चातापचि वेळ येवु नये. रस्त्यावर त्रासदायक ठरणाऱ्या या कुत्र्यांचे निर्बिजिकरण व नियंत्रण पथकांमार्फत नियमित कारवाई परिणामकारकरित्या होणे गरजेचे आहे.



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त