कलाकार राजकारणात केवळ प्रसिद्धीमुळेच

कलाकारांना राजकीय प्रवेश मिळतो तो केवळ त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा उचलण्यासाठी. त्यामुळे असे कलावंत राजकारणात गेल्याने कलाक्षेत्राला काय व किती फायदा मिळतो याबद्दल कुणाला देणेघेणे नसते. मराठी व हिंदी टीव्ही-चित्रपट-नाट्य श्रुष्टीतील अनेक कलाकार विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेशकर्ते झालेले आहेत व लोकप्रतिनिधी म्हणून निवडूनदेखील आलेले आहेत. मात्र त्यातला कुणीही, कलाकारांचे प्रश्न घेऊन सरकारदरबारी पोटतिडकीने बाजू मांडताना दिसलेला नाही. मुळात राजकारणात गेलेले हे कलाकार पैसा व प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असतात. त्यांना सर्वसामान्य कलाकार, पडद्यामागे काम करणारे सहाय्यक, तंत्रज्ञ, व्यवस्थापक, करिअर घडवण्याच्या प्रयत्नात असलेले हरहुन्नरी मात्र दुर्लक्षित कलावंत यांच्या समस्यांशी फार सोयरसुतक नसते. कलावंत म्हणून लोकांमधील प्रसिद्धीच्या बळावर ते निवडून येतात व राजकारणी म्हणून नाव मिळवतात. सर्वसामान्य लोकांच्या त्यांच्याकडून चित्रपटाप्रमाणे वास्तविक जीवनात असामान्य कामगिरीच्या अपेक्षा असतात. मात्र या अपेक्षांना खरे उतरण्याची कामगिरी त्यांच्याकडून अपवादानेच होत असल्यामुळे कालांतराने राजकारणी म्हणूनदेखील हे कलाकार लोकांच्या मनातून व चर्चेतून उतरतात हा इतिहास आहे.


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त