भ्रष्टाचाराची कीड मुळापासून उपटायला हवी
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
भ्रष्टाचार ही एक सामाजिक कीड आहे. ही कीड इतकी खोलवर रुतली आहे की ती मुळापासून उपटून काढणे कुठल्याही सरकारला आजवर शक्य झालेले नाही. प्रशासनापासून ते राजकारण्यांपर्यंत भ्रष्टाचाराचे धागेदोरे आढळून आलेले आहेत. लाचलुचपत खात्याने प्रशासनातील अशी असंख्य प्रकरणे उघडकीस आणलेली आहेत. राजकारणातील प्रामाणिक पणा सध्या दुर्मिळ होऊ पाहत आहे. सध्या भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर करत असलेले आरोप तपास यंत्रणांकडून सिद्ध झाले तर ती अतिशय गंभीर बाब ठरेल. अगोदरच अनेक बड्या नेत्यांवर ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू आहे व त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. सरकारचे महत्वाचे प्रकल्प व योजनांमध्ये भ्रष्टाचाराची मुळे दडलेली आहेत. लोकांचा कर रूपाने भरलेला पैसा असा भ्रष्टाचारातून वाहून जात असेल तर लोकांना किती गुणवत्तेच्या सुविधा मिळत असतील याबाबत शंकाच आहे. सामाजिक कार्यकर्त्यांची व लोकांची जागरूकता भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे काम करते. त्यामुळे भ्रष्टाचार व सरकारी कामांमधील अनियमितता शोधुन काढून ती उघडकीस आणल्यामुळे भविष्यात घोटाळ्यांना आळा बसण्याची शक्यता बळावते. भ्रष्टाचारमुक्त राजकारण व प्रशासन आज लोकशाहीची सर्वात मोठी गरज आहे व ती पूर्ण होण्यासाठी सत्ताध्याऱ्यांची सकारात्मक मानसिकता अत्यंत गरजेची आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
मार्मिक भाष्य...!
ReplyDelete