रेल्वे कर्मचाऱ्यानेच प्रमाणपत्र तपासावे

कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेचा लोकल प्रवास खुला करण्यात आलेला आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तपासण्यासाठी रेल्वेने कर्मचारी नियुक्त न करता महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांवर हा भार टाकलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पालिका कर्मचारी, शिक्षक हे प्रवाशांची कागदपत्रे तपासताना दिसत आहेत. वास्तविक कोविड मध्ये काम करणाऱ्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी जेव्हा लोकल सुरू होती त्यावेळी त्यांचे ओळखपत्र तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांकडून तपासले जात होते. मात्र आता कोविड लसीचे दोन डोस घेतलेली प्रमाणपत्रे तपासण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यामागील उद्देश अनाकलनीय आहे. जे काम तिकीट देणारा रेल्वे कर्मचारी करू शकतो त्यासाठी महानगरपालिकांतील शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवस भर रेल्वे स्थानकांमध्ये बसवून हे अधिकचे व अनावश्यक काम देण्यात काय अर्थ आहे? 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त