दोन्ही कार्यक्रमांच्या वेळा वेगवेगळ्या हव्यात

बिग बी अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला सोनी टीव्हीवरील रिऍलिटी शो कौन बनेगाा करोडपती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या २३ ऑगस्टपासून या कार्यक्रमाचा १३वा सिझन सुरू झालेला आहे. याच कार्यक्रमाच्या धर्तीवर काही वर्षांपूर्वी 'कोण होणार करोडपती' हा मराठी रिअलिटी शो सुरू करण्यात आला होता जो खूप लोकप्रिय ठरला. सध्या प्रसिद्ध अभिनेता सचिन खेडेकर यांचं होस्टिंग असलेल्या या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मागच्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे या रिअलिटीशोचं प्रसारण झालं नाही मात्र मार्च पासून हा शो पुन्हा एकदा सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेला आहे. मराठी व हिंदीतील दोन्ही दिग्गज कलाकारांच्या सोबत सर्वसामान्य व्यक्तींना बसून ज्ञानाचा हा खेळ पाहताना प्रेक्षकांचे खूप मनोरंजन होते व सोबतच ज्ञानातदेखील भर पडते. मात्र सध्या या दोन्ही कार्यक्रमांची वेळ एकच रात्री ९ वाजता असल्याने दोन्ही कार्यक्रमांच्या चाहत्यांची मोठी निराशा होत आहे. त्यामुळे सोनीच्याच मराठी व हिंदी वाहिन्यांवर सुरू असलेल्या एका चांगल्या ज्ञानवर्धक कार्यक्रमांची वेळ एकच न ठेवता दोन्ही कार्यक्रमाच्या वेळा वेगवेगळ्या असाव्यात जेणेकरून प्रेक्षक दोन्ही कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकतील. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा