त्यांनी पुनरागमन न केलेलंच बरं!

कलर्स मराठी चॅनेलवर सुरू झालेला मराठी बिग बॉसचा ३ रा सिजन त्यातील सहभागी स्पर्धक व त्यांच्यात सुरू असलेल्या हमरीतुमरीवरून बराच चर्चेत आहे. त्यातील दादूस , विकास पाटील आणि विशाल निकम यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. तर कीर्तनकार शिवलीला पाटील, तृप्ती देसाई यांचे उघड वाद सतत रंगताना दिसले. त्यातच आता शिवलीला पाटील या सदस्याने या घरातून तब्येतीच्या कारणास्तव काढता पाय घेतला आहे. सुरुवातीपासूनच शिवलीला पाटील यांच्या शोमध्ये येण्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. किर्तनकाराने पैसा प्रसिद्धीच्या मागे न जाता मोह मायेपासून दूर राहायला हवे अशी भावना त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली होती. त्यामुळे त्या किती दिवस या रोजचे वादविवाद, हेवेदावे, भांडणे दाखवणाऱ्या घरात टिकतील याबाबत शंका होतीच. मागील काही दिवसांपासून शिवलीला बिग बॉसच्या घरात राहून कुठल्याही टास्कमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या. कीर्तन, प्रबोधन करणाऱ्या व्यक्ती बिग बॉस सारख्या वादविवादपर मनोरंजन कार्यक्रमामध्ये दिसणे जरा खटकणारेच आहे. त्यामुळे शिवलीला पाटील यांनी तब्येतीच्या कारणानं जरी त्या घरातून एक्झिट घेतली असली तरी त्यांनी आता पुन्हा तिथे पुनरागमन न केलेलंच बरं!  



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा