महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा विसर

महाराष्ट्रात सध्या विकासाच्या प्रकल्पांऐवजी राजकीय कुरघोड्या, उणिधुणी, ईडी, सीबीआय, श्रेयवाद हेच अधिक पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वसामान्यांच्या सण उत्सव साजरे करण्यावर, एकत्र येण्यावर असंख्य बंधने तर दुसरीकडे राजकीय कार्यक्रम मोठ्या जोशात सुरू असल्याचे दिसून येत आहे. कधी नव्हे इतकी राजकारणाने खालची पातळी गाठली असल्याचे नेत्यांच्या वक्तव्यांनी दिसून येत आहे. राजकीय कार्यक्रम, मेळावे, पत्रकार परिषदा ह्या केवळ एकमेकांवर आरोप करण्यासाठीच आयोजित केल्या जातात का इथपर्यंत शंका येते. एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी नेतेमंडळी सोडत नाहीत. चौकशा, घोटाळे, आरोप प्रत्यारोप नित्याचेच झालेत. विकासाची कामे तसेच शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, व्यापाऱ्यांचे प्रश्न यामध्ये कमालीचे दुर्लक्षित राहत आहेत. सत्ता हे एकमेव केंद्र डोळ्यासमोर ठेवून चालणाऱ्या आजच्या राजकारण्यांना महाराष्ट्राच्या गौरवशाली व वैचारिक परंपरेचा विसर पडलेला दिसतोय. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा