तर्कविसंगत मालिका

झी मराठीवर सुरू असलेली 'ती परत आलीय' ही मालिका हॉरर आहे की सस्पेन्स हे कळायला मार्ग नाही. यात अनेक प्रसंग जाणीवपूर्वक केवळ मालिकेची लांबी वाढवण्यासाठी दाखवले जात असल्याचे वारंवार वाटते. अभय नावाचे पात्र ज्याचा मृत्यू झाला म्हणून त्याला पुरले जाते आणि अनेक दिवसानंतर हे पात्र अचानक संशयित भुताच्या अवतारात सापडते. मात्र इतके दिवस तो कुठे होता, कुठे राहिला, कुठले कपडे घातले, काय खाल्ले हे सर्व अनुत्तरीतच आहे. बरं तो पुन्हा ग्रुप मध्ये आल्यावर एका गरोदर महिलेशी संधान साधून हे सर्व करत होता हे दाखवणेही अतिशयोक्तीच आहे. यातला त्याचा हेतू, उद्देश सर्वच अनाकलनीय आहे. बाबुरावच्या संशयास्पद हालचाली तसेच अनेकदा संशयित ठिकाणी व पद्धतीने तो आढळल्यानंतरदेखील नामानिराळा राहतो हेदेखील जरा आवास्तवच वाटते. इतके दिवस खाऊन पिऊन एशोआरामात जीवन जगत असताना त्या जंगलामधून बाहेर पडण्याचा किंवा बाहेरच्या माणसांशी संपर्क साधण्याचा जरादेखील प्रयत्न रिसॉर्टमध्ये (मर्जीने) 'अडकलेल्या' ह्या मुलांकडून होताना दिसत नाही. त्यांना कोणी जखडून ठेवलेय हेदेखील कळायला मार्ग नाही. त्यामुळे अशी संदर्भहीन, वाहवत चाललेली, तर्कविसंगत मालिका आता आवरती घ्यावी. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त