मराठीची देशात तिसऱ्या क्रमांकावर झेप

मागील आठवड्यात सोनी टीव्ही वरील प्रसिद्ध कौन बनेगा करोडपती या ज्ञानवर्धक शो मध्ये विचारलेल्या एका प्रश्नात देशात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून मराठी असल्याची माहिती देण्यात आली. देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. हिंदी ही अव्वल आहे. तर बंगाली ही दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. खरेतर समस्त महाराष्ट्रवासीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जवळपास साडेआठ कोटी लोकांची बोलीभाषा मराठी आहे. देशात पन्नास कोटींच्या वर लोक हिंदी भाषिक तर साडेनऊ कोटी लोक बंगाली भाषिक आहेत. मराठी संवर्धनासाठी सुरू असलेल्या चळवळीला बळ देणारी ही बाब आहे. देशात झालेल्या जनगणेच्या सर्वेक्षणातदेखील ही बाब स्पष्ट झाली आहे. मराठी भाषा सातासमुद्रापारदेखील पोहीचली असून ही भाषा जगात १८ क्रमांकावर आहे. तर भारतातील आता तिसऱ्या क्रमांची भाषा आहे. मराठीचे जतन व प्रसार करण्याची जबाबदारी महाराष्ट्रवासीयांचीच असून येत्या काळात मराठी अधिकाधिक समृद्ध होईल अशी आशा करायला हरकत नाही. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त