गडचिरोली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
नुकतेच गडचिरोलीत नक्षलवादी गटाशी झालेल्या चकमकीत पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांना संपवले. यामध्ये ठार झालेला मिलिंद तेलतुंबडे हा नक्षलवादी एमएमसी झोनचा कमांडर होता. त्यामुळे नक्षलविरोधी चळवळीतील हे मोठे यश असून त्याचा महाराष्ट्रालाच नाही तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडलाही मोठा फायदा झाला आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा राज्यांना न जमलेलं काम गडचिरोली पोलिसांनी करून दाखवलं आहे. गडचिरोलीत किमान १०० नक्षलवाद्यांशी चकमक उडाली होती. त्यात छत्तीसगडचेही काही नक्षलवादी होते. सी-६० कमांडोनी जोरदार हल्ला केल्याने २६ नक्षलवादी मारले गेले तर बाकीचे नक्षलवादी पळून गेले. गडचिरोलीत बाहेरून येणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या वाढत आहे. स्थानिक मुलांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे बाहेरच्या मुलांची नक्षलवादी कारवायांसाठी भरती करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांविरुद्धची लढाई दिवसेंदिवस अधिक कठीण बनत चालली असून त्या दृष्टीने पोलिसांची गडचिरोलीतील ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे. नक्षली हल्ल्यांमध्ये सातत्याने होत असलेली जीवित व वित्त हानी रोखण्यासाठी राज्यातील नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठीची कारवाई अधिक तीव्र करण्याची आवश्यकता आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment