लसीचा दुसरा डोस अपरिहार्यच

ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या प्रकारचे रुग्ण सध्या राज्यात आढळू लागलेले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये या विषाणूचा वेगाने पसरणारा फैलाव पाहता त्याबाबतची आवश्यक काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे जे हत्यार आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे त्याचा उपयोग नक्कीच होत आहे. मात्र लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यास अद्यापही अनेक जण संकोच वा टाळाटाळ करताना दिसतात. गैरसमजुतीतुनही लस न घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाचा उद्रेक पुन्हा होऊ द्यायचा नसेल तर सर्वांनी स्वयंस्फूर्तीने लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. सध्या विषाणूला रोखण्यासाठी आपल्याकडे मास्क व लसीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त