लग्नसमारंभाचा आदर्श

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मुलीचे लग्न नोंदणी पद्धतीने करून समाजासमोर एक प्रकारचा स्तुत्य आदर्श ठेवला आहे. सामाजिक प्रतिष्ठेपायी लग्नसमारंभांवर वारेमाप खर्च करणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. त्यात सामाजिक प्रतिष्ठा लाभलेले लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी, धनाढ्य व्यवसायिक यांच्या मुलांची लग्ने आजकाल डोळे दिपवणारी ठरत आहेत. मात्र याच शोभेच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे कर्जबाजारी होत आहेत. याला आळा घालून लग्नासारखे कौटुंबिक समारंभ साधेपणाने उरकण्यासाठी समाजातील जागरूक लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. मंत्री आव्हाड यांनी मुलीचे लग्न अत्यंत साधेपणाने उरकून ते समाजमाध्यमांसमोर आणून एक नवा पायंडा पाडलेला आहे. त्याची पुनरावृत्ती येत्या काळात समाजात होणे काळाची गरज बनली आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा