एसी लोकलचा अट्टाहास कशासाठी?

प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एसी लोकल आता अडचणीच्या ठरू लागलेल्या आहेत. अवाच्या सव्वा तिकीट दरांमुळे कुठलाही प्रवाशी या लोकलकडे फिरकत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने त्या बिनकामाच्याच ठरताना दिसत आहेत. एकीकडे अन्य लोकल तुडुंब गर्दीने तर दुसरीकडे एसी लोकल रिकाम्या धावताना दिसत आहेत. मध्य, पश्चिम, हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर या एसी लोकल अधून मधून विनाप्रवाश्यांच्याच धावत आहेत. ही लोकल स्टेशनवर आली की कुणीही त्या गाडीत चढत नसल्याने फलाटांवरील प्रवाशी संख्येत लगेच वाढ होते व पुढील गाडीवर त्याचा अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे एसी लोकलचा हा अट्टाहास नेमका कशासाठी केला असा प्रश्न पडतो. या लोकलचे तिकीट दर कमी करून प्रवाशांना त्याचा खराखुरा लाभ देणे गरजेचे आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त