भविष्यात असे प्रकार घडू नयेत

पंतप्रधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च पद आहे. या पदाचे संविधानिक महत्व मोठे असून त्या पदावरील व्यक्तीची सुरक्षितता ही राष्ट्रीय सन्मानाची बाब आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेली पंतप्रधानांची सुरक्षा सर्वोच्च प्रधान्याची बाब आहे. पंतप्रधान जेव्हा देशांतंर्गत प्रवास करतात तेव्हा तेथील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी राज्य व केंद्र यांची सामूहिक असते. दौऱ्याच्या काही काळ अगोदर प्रवास मार्ग व कार्यक्रम स्थळाची चोख तपासणी करण्यात येते. मात्र पंजाबमध्ये घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून पंतप्रधानांच्या सुरक्षा रचनेत अनेक उणिवा राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षेचे मोठे वलय व जाळे असतानादेखील एखाद्या अडथळ्याची कल्पना न येणे सुरक्षेत त्रुटी राहील्याचे दर्शवते. एखादे आंदोलन व धरणे अचानक उद्भवत नसते, त्याची कल्पना स्थानिक व राज्याचे पोलीस, प्रशासन किंवा महत्वाच्या व्यक्तीच्या प्रवासावेळी गुप्तचर यंत्रणांना असायला हवी. मात्र तसे न होता पंतप्रधानांचा मार्ग अचानक अडवला जाणे सुरक्षा यंत्रणांचे अपयश म्हणावे लागेल. त्यामुळे पंतप्रधानांच्या बाबतीत पंजाब राज्यात घडलेल्या प्रकारापासून शिकवण घेऊन भविष्यात असे प्रकार घडू न देण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त