मराठी पाट्यांचा निर्णय स्वागतार्ह

दुकांनांवरील नावाच्या पाट्या मराठीत करण्याचा सरकारचा निर्णय तमाम मराठी जनांसाठी स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेची सातत्याने होत असलेली गळचेपी, मराठीतर भाषेचा होत असलेला विस्तार, बंद पडण्याच्या मार्गावरील मराठी माध्यमाच्या शाळा, पाश्चात्य संस्कृतीचे नको तितके अनुकरण यामुळे राज्यात विशेषतः शहरी भागांमध्ये मराठी नावापुरतीच उरली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मराठी संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. शेजारील राज्ये आपापल्या मातृभाषेचा कडवा पुरस्कार करत असताना महाराष्ट्रात मात्र मराठीसाठी म्हणावा तितका अट्टाहास होताना दिसत नाही. राज्यात इतर भाषिकांचे वाढलेले स्थलांतर हे कारणदेखील त्याला आहे. त्यामुळे मराठीची सातत्याने होत असलेली पीछेहाट दुर्दैवी आहे. यासाठी शासकीय व्यवहार, न्यायालयीन कामकाज, बँक व्यवहारदेखील मराठीमध्ये करण्यासाठी आगामी काळात पावले उचलणे गरजेचे आहे. दुकानांवरील नावाच्या पाट्या मराठीत करण्याचा निर्णय याची नांदी ठरावी व सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा. सरकारचा हा निर्णय म्हणजे 'देर आये दुरुस्त आये' असाच आहे. मात्र मराठी पाट्यांच्या ह्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस यंत्रणा आगामी काळात उभी करणे अत्यंत गरजेचे आहे.



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त