सकारात्मक देवमाणूस दाखवायला काय हरकत आहे?

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेचा दुसरा सिझन नुकताच सुरू झालाय. डझनभर खून करून पसार झालेला पण गावकऱ्यांच्या दृष्टीने मेलेला डॉ अजितकुमार अर्थात देवमाणूस पुन्हा त्याच गावात राजस्थानी बनून साक्षात्कार झाल्याप्रमाणे राजस्थानी पत्नीसह परतलाय. त्याला मंगलच्या कुटुंबासह गावकऱ्यांनीदेखील ओळखले आहे. मात्र तो स्वतः अजितकुमार असल्याचे मानायला अजून तयार नाही. त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये या नव्या रुपात आलेल्या देवमाणसाचे सदाचारी रूप पाहायला मिळते की पुन्हा नवे सावज शोधण्यासाठी त्याची ही खेळी आहे हे पाहायला आणखी काही भागांची वाट पाहायला लागेल. पहिल्या सीझनमध्ये दाखवण्यात आलेल्या देवीसिंगचे खरे रूप सत्यघटनेतील कथानकाप्रमाणे उघडे करण्यात आले होते. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चादेखील झाली होती. त्यामुळे ह्या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये ह्याच देवमाणसाचे गुन्हेगारी रूप न दाखवता सकारात्मक रूप प्रेक्षकांना दाखवून चांगला संदेश दिला जावा अशी अपेक्षा आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा