व्हॅलेन्टाईन हा काही सण नाही!

प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आपल्याकडे दृढ आहेत. व्हॅलेंटाईन डे ह्या एकाच विशिष्ट दिवशी प्रेम व्यक्त का करावे हा खरा तर यक्षप्रश्न आहे. ज्याच्यावर आपले खरे प्रेम आहे ती व्यक्ती सदासर्वदा आपल्यासाठी प्रेमाचीच असते. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी ठराविक दिवस, वेळ, काळ असू शकत नाही. व्हॅलेन्टाईन डे हा कुठला भारतीय सण, उत्सव नाही की जो जल्लोषात साजरा केला पाहिजे. गेल्या काही वर्षांत या दिवशी तरुण, अल्पवयीन मुलामुलींचा जो काही धांगडधिंगा पाहायला मिळत होता त्यामुळे व्हॅलेन्टाईनला विरोध वाढत गेला. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण मोठया प्रमाणावर होऊ लागल्याने भारतीय सुसंस्कृतपणा कुठेतरी लुप्त होत चाललाय. गुढीपाडव्याएवजी ३१ डिसेंबरला नव्या वर्षाचे धुंदावस्थेत स्वागत करणारी आजची पिढी व्हॅलेन्टाईन डेलादेखील आपला सण समजत आहेत. त्याऐवजी या दिवशी काहीतरी समाजोपयोगी कामे करून या दिवसाप्रति आपली सद्भावना प्रकट करायला काय हरकत आहे? 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा