महाशिवरात्री - प्राचीन मंदिरांचे ठाणे-पालघर

ठाणे पालघर मधील प्राचीन शिवमंदिरे

यंदाच्‍या महाशिवरात्री उत्‍सवावरदेखील कोरोनाचे काहीसे सावट आहे. त्‍यामुळे अंबरनाथच्‍या शिवमंदिरासह काही शिवमंदिरांमधील यांत्रावर निर्बंध आणण्‍यात आलेले आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये अनेक शिवमंदिरे प्रसिध्‍द असुन या ठिकाणी सतत भाविकांची वर्दळ सुरु असते. ठाणे जिल्‍हयातील अंबरनाथ आणि खिडकाळी येथील प्राचीन शिवमंदिर सर्वपरिचीत आहेत. तसेच ठाणे शहराच्या प्राचीनत्वाची खूण सांगणारे एक मंदिर म्हणजे कौपिनेश्वर मंदिर. मासुंदा तलावाजवळ असलेल्‍या या मंदिराची उभारणी १७६०मध्ये झाली. पेशव्यांच्या दरबारी असलेल्या सरसुभेदार रामजी बिवलकर यांनी हे मंदिर बांधले आहे. पेशव्‍यांनी १७६० साली बांधलेल्‍या हया मंदिरातील शिवलिंग तब्बल तीन फूट उंच आणि १२ फुटांचा गोलाकार घेर भव्य आकाराचे आहे. मंदिराच्या सभागृहाला १६ कलात्मक खांब असून खांबाच्या तळाशी कलशाची चित्रकृती कोरण्यात आलेली आहे. डोंबिवलीच्या ग्रामीण भागात सागाव येथे असलेले पिंपळेश्वर हे मंदिर १५० वर्षांपूर्वीचे आहे. शहापूर तालुक्यातील आणि टिटवाळय़ापासून जवळच असलेले श्रीगंगा गोरजेश्‍वर हया ५०० वर्षे जुन्‍या शिवमंदिरात जाण्‍यासाठी होडीचा आधार घ्यावा लागतो. प्राचीन हेमाडपंथी शैलीतल्‍या या मंदिरातील शिवलिंगही पाण्यात आहे. या मंदिरामागे गरम पाण्याची कुंड आहेत. भिवंडीजवळील लोणाड येथे एका टेकडीवर बौद्धकालीन लेणी आहेत, याच लेण्यांपासून काही किलोमीटर अंतरावर लोणाडचे शिवमंदिर आहे. रामेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिरातील खांबांवर आणि भिंतीवर नक्षीकाम आणि विविध देव-देवतांची शिल्प कोरण्यात आलेली आहेत. ठाण्याच्‍या घोडबंदर रोडवर गायमुख या ठिकाणी नागला बंदराच्या विरुद्ध बाजूला एका निसर्गरम्‍य टेकडीवर शंभरेक  पाय-या चढल्‍यावर जागनाथ महादेव मंदिर वसलेले आहे. तसेच पालघर जिल्‍हयातील वाडा तालुका हादेखील प्राचिन मंदिरे व ऐतिहासिक पार्श्‍वभुमी असलेला परिसर म्‍हणूनदेखील प्रसिध्‍द आहे. तालुक्यातील वैतरणा नदीच्या काठावर तिळसेश्वर हे शिव मंदिर अत्‍यंत प्राचीन असुन पर्यटन स्‍थळ म्‍हणूनदेखील ओळखले जाते. वाडा बस स्थानकापासून ७ कि.मी. अंतरावर असलेल्‍या हया मंदिरात जाणेयेणेसाठी बस व खाजगी वाहनांची सुविधा आहे. वैतरणा नदी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी जत्रा भरते, महाशिवरात्री यात्रेच्‍या दिवशी ठाणे, पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ‍भाविक या ठिकाणाला भेट देतात. विविध वस्‍तु व खादयपदार्थांची असंख्‍य दुकानांची या ठिकाणी रेलचेल असल्‍याने स्‍थानिक व आसपासच्‍या परिसरातील लोकांना चांगला रोजगारदेखील उपलब्‍ध होतो. या ठिकाणचे आणखी एक वैशिष्‍टय म्‍हणजे, मंदिरालगतच्या नदिपात्रातील डोहात असणारे "देवमासे". तिळसेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या वैतरणा नदीच्या डोहात हे देवमासे आहेत. कुंडातील असंख्‍य देवमासे भाविकांना सहजि‍रित्‍या दृष्‍टीपथास पडतात. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी महाशिवरात्री व इतर दिवशी सुद्धा मोठी गर्दी असते. तिळसेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर असल्याने या मंदिराला माहात्म्य प्राप्त झाले आहे. या मंदिराचा संबंध भारतातील १२ ज्योतिर्लिंगांमध्ये गणल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर महादेवाशी असल्याचा पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ आहे. वैतरणा नदीच्या तीरावर उंच चढल्यावर मंदिरात जाण्यासाठी पादचारी पूल बांधल्याने मंदिराची शोभा द्विगुणित झाली आहे. येथील नदी मूळ गोदावरीच असून ती ब्रह्मगिरीतून आली आहे. येथे तिळसेश्वराची स्वयंभू पिंड आहे. पिंडीवर टाकलेले नाणे नदीतील मासे असलेल्या कुंडात पडत असे. अलीकडे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. येथील एका खोल कुंडांमध्ये असलेल्या माश्यांच्या चमत्कारिक आख्यायिकेमुळेच येथे हे मासे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते, मात्र हे मासे पाहण्यासाठी येणारी माणसे या माशांना खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाह्या, पाव तसेच इतर अनेक पदार्थ टाकत असतात. या पदार्थांमुळे हे पाणी घाण होते तसेच पाण्यावर तेलकट द्रावण तयार होते. त्यामुळे पाण्यातील माश्यांना ऑक्सिजन मिळण्यास अडचणी येत असल्याने श्वसनामध्ये बाधा येऊन हे मासे मारतात. तसेच पाण्यात खाद्य पदार्थाबरोबर प्लास्टिक च्या पिशव्या टाकल्या जातात. ह्या पिशव्यांची तसेच खाण्यासाठी टाकलेल्या पदार्थांनमुळे हे पाणी प्रदूषित होतेच मात्र नंतर हे मासे ह्या पिशव्या खाद्य म्हणून खातात. काही वर्षापुर्वी येथील अनेक मासे महाशिवरात्रीनंतर मृत्यूमुखी पडले होते. त्‍यामुळे भाविक व पर्यटकांनी या ठिकाणी माशांना खादय टाकताना खदरदारी घेणे गरजेचे आहे. हे मासे 'महाशीर' या दुर्मिळ जातीचे असून ते चीन आणि भारतात तिळसेश्वर येथे बघायला मिळतात. नदीपात्राशेजारी धार्मिक विधीदेखील करण्यात येतात. या नदीवरील पुलाला लागूनच अलीकडेच उभारण्‍यात आलेले विठ्ठल रखुमाईचे एक सुंदर मंदिरदेखील असुन आजूबाजूला विविध फुलझाडे व भाजीपाल्याच्या शेतीमुळे तसेच मंदिराशेजारील जागेत सुशोभीकरण करण्यात आल्याने या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलते. मंदिराच्या सभामंडपात चोहोबाजूंनी संतांच्या प्रतिमा बसवण्यात आल्या असून त्याखाली दैनंदिन जीवनातील उपयुक्त त्यांच्या रचना व वचने रेखाटण्यात आली आहेत. एकंदरीत ठाणे मुंबई शहरापासून जवळपास ७५ ते ८० किलोमीटर अंतरावरील तिळसेश्वर हे शिवशंभो महादेवाचे ठिकाण एक दिवसाच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण आहे. भिवंडीमार्गे वाडा येथुन तसेच मुंबई – नाशिक महामार्गावरुन खर्डी किंवा वाशिंद येथुनदेखील या म‍ंदिराकडे जाता येते. वाडा तालुक्‍यातील काटी या गावामध्‍ये वर्जेश्‍वरी देवीचे मुळ स्‍थान असलेले भागिर्थी हे मंदिरदेखील खूप ऐतिहासीक आहे. मंदाकिनी पर्वताच्‍या पायथ्‍याशी वसलेल्‍या या मंदिराला भव्‍य सभामंडप उभारण्‍यात आलेला असुन मंदिराजवळ एक प्राचीन कुंडदेखील अस्तित्‍वात आहे. आजुबाजुच्‍या गावातील ग्रामस्‍थांसाठी हे ठिकाण विसर्जन घाट म्‍हणूनदेखील प्रसिध्‍द असुन येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. ठाणे व पालघर जिल्‍हयात अशी अनेक मंदिरे सुप्रसिध्‍द असुन महाशिवरात्रीच्‍या निमित्‍ताने त्‍यातील काही मंदिरांची ही थोडक्‍यात तोंडओळख.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त