लस न घेतलेल्यांवर कारवाई आवश्यक

कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लोकांमध्ये दिसून आलेली भीती सध्या रुग्णासंख्या वाढत असतानाही दिसून येत नाही. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली तरी दोन तीन दिवसांतच लक्षणे नाहीशी होत असल्याने या आजाराचा धोका तसा कमी झालेला आहे. याला कारणीभूत खरेतर कोविड लसीकरण आहे. बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले असल्याने कोविड संसर्गाचे सुरक्षा कवच त्यांना लाभलेले आहे. त्यामुळे लोकांमधील संसर्गाची व मानसिक भीती बऱ्याच अंशी कमी झालेली आहे. तसेच कोविडची लागण झाल्यावर दिसून आलेला मृत्युदरदेखील कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे लसीकरणाचा सकारात्मक परिणाम कोविड साथीच्या बाबतीत दिसून येत आहे. मात्र अद्यापि अनेक नागरिक लसीकरणापासून दूर असून पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोस न घेतलेल्यांची संख्याही मोठी आहे. अशा व्यक्ती तुलनेत लवकर बाधित होतात व इतरांनाही संसर्गाचा जास्त धोका निर्माण करतात. सध्यातरी लसीकरण हा एकमेव सक्षम उपाय कोविड प्रतिबंधासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेण्यासाठी अद्यापि तयार न झालेल्या किंवा वंचीत राहिलेल्या व्यक्तींना शोधून त्यांना प्राधान्याने लस देण्याबाबत कार्यवाही व्हायला हवी. तसेच जे नागरिक जाणीवपूर्वक लस घेण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याबाबतदेखील विचार व्हायला हवा. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त