मोफत वैदयकीय व दंत शिबिरे
ग्रामीण रुग्णांसाठी वरदान ठरताहेत वैदयकीय व दंत शिबिरे
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील आदिवासी व बिगर आदिवासी भागातील रुग्णांना विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याच्या हेतुने वैदयकीय व दंत शिबिरांचे आयोजन केले जाते. यामध्ये शासकीय व खाजगी वैदयकीय व दंत महाविदयालयांतील विशेषज्ञ सेवा देतात. या शिबिरांसाठी भिषक, शल्य चिकीत्सक, बालरोग तज्ञ,कान, नाक, घसा तज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोग तज्ञ, प्रसुती व स्त्री रोग तज्ञ, दंत चिकीत्सक व बधीरीकरण तज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात. या शिबीरांमध्ये मोफत औषधोपचार करण्यात येतात. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियांची आवश्यकता भासते त्यांचेवर शस्त्रक्रिया करण्यात येतात. मागील आर्थिक वर्षात राज्यभरामध्ये अशी एकूण ३१ शिबीरे आयोजित करण्यात आली. ज्यात जवळपास ३०४६८ रुग्णांनी लाभ घेतला तर जवळपास २१०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. चालू वर्षी आजवर २३ शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत.
दरवर्षी पालघर जिल्ह्यामध्येदेखील वैद्यकीय आणि दंत शिबिराचे आयोजन
केले जाते. २०१६
पासून मुंबईतील डॉ डी वाय पाटील रुग्णालयाची टिमदेखील या शिबिरांमध्ये सहभागी होत
आहे. त्यामध्ये डॉ कैलास जवादे, प्राध्यापक व पथक प्रमुख शल्यचिकित्सा विभाग डी
वाय पाटील रुग्णालय, नेरूळ नवी मुंबई, हे डी वाय पाटील रुग्णालयातील तज्ञ बालरोग
शल्यचिकित्सक डॉ नंदिता सक्सेना आणि डॉ पुजा मुलतानी, स्टाफ नर्सेस,
फिजिशियन
असोसिएटचे विद्यार्थी तसेच इतर अलाईड हेल्थ सायन्सेसच्या विद्यार्थ्यांचा चमू घेऊन
या शिबिरांमध्ये सहभागी होतात. या वर्षी अधिष्ठाता डॉ व्हि के सशिंद्रन यांच्या
सल्ल्यानुसार शल्यचिकित्सा विभागातील इतर तज्ञ व पदव्युत्तर विद्यार्थी यांनादेखील
चमुमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. नुकत्याच पालघर जिल्हयातील जव्हार आणि डहाणू
या ठिकाणी झालेल्या शिबिरांमधून अवघ्या दोन दोन दिवसांच्या कालावधीत जळपास २०० शस्त्रक्रिया करण्यात
आल्या. डी वाय पाटील रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या चमुमध्ये डॉ कैलास जवादे,
डॉ
नंदिता सक्सेना, डॉ पूजा मुलतानी, डॉ सौरभ, डॉ अभिजीत बुधकर
या तज्ञ शल्यचिकित्सकांसोबत शल्यचिकित्सा
विभागातील पदव्युत्तर प्रशिक्षण घेणारे निवासी डॉक्टर्स, फिजिशियन
असोसिएट अभ्यासक्रमात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्टाफ
नर्सेस यांचा समावेश होता. या शस्त्रक्रियांमध्ये लहान मुलांमधील आढळून येणाऱ्या congenital
hernia, phimosis, undescended testis, toung tie, small swellings etc या
आजारांवरील शस्त्रक्रियांचा विशेषतः समावेश होता. मोठ्या व्यक्तींमधील आढळणाऱ्या Hernia,
hydrocele, appendix, lipoma, sebaceous cyst, fibroadenoma, piles, fissure,
swellings etc या आजारांवर देखील शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या
शिबिरामध्ये तोंडामध्ये अनेक वर्षांपासून चरबीची मोठी गाठ असल्याने बोलण्यामध्ये
तसेच जेवणामध्ये अडचण येत असणाऱ्या महिलेवर तसेच पाठीवरील मोठ्या चरबीच्या गाठी वर
अत्यंत कमी भूलेचे औषध वापरून शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अत्यंत कमी कालावधी आणि
अत्यल्प साधन सामग्री यांचा वापर करून हे शल्य चिकित्सा शिबिर यशस्वी करण्यात आले.
स्थानिक पातळीवर जव्हार येथे डॉ राजगुरु तसेच डॉ मडावी यांनी तर डहाणू येथे डॉ
बालाजी हेंगणे यांनी समन्वयाचे कार्य
केले. पालघर जिल्हयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ बोदाडे यांनी शिबीराच्या यशस्वी
आयोजनासाठी आवश्यक बाबी पूरवल्या व शिबीरात सहभागदेखील घेतला.
पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील दुर्गम भागातील आदिवासी वस्ती असणाऱ्या लोकांचा जिल्हा समजल्या जातो. आरोग्याच्या सेवा अद्यापही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. लोकांमध्ये असणाऱ्या आरोग्याच्या जाणिवेचा अभाव तसेच पैशांची चणचण या कारणांमुळे येथील लोक मोठ्या शहरात जाऊन शल्यचिकित्सा करू इच्छित नाहीत. अशा परिस्थितीत शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या शिबिराची स्थानिक नागरिक वर्षभर प्रतीक्षा करतात. त्यामुळेच शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर चेहऱ्यावर असणारा आनंद तसेच त्यांच्या मनात असणारी तज्ञ डॉक्टरांविषयीची भावना अत्यंत बोलकी असते. मागील दोन वर्षात कोरोना मुळे शासकीय तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील होणार्या शल्य चिकित्साचे प्रमाण खूप कमी झाले होते. त्यामुळे या शिबिरामध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांना खूप काही शिकता आले. या अनुभवाचा उपयोग निश्चितच भविष्यामध्ये होईल असे मत वैदयकीय शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांनी व्यक्त केले.
तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येत असलेल्या अशा शिबिरांचा गरजू रुग्णांसाठी मोठा उपयोग होत आहे. त्यांना औषधोपचारासाठी फार दूर जावे लागत नसल्यामुळे प्रवासाचा आर्थिक भारही त्यांच्यावर पडत नाही. पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी तसेच अलाइड हेल्थ सायन्सेस आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अशा शिबिरांमध्ये सहभाग घेऊन काम केल्यास त्यांनादेखील खूप काही शिकता येऊ शकते. समाजासाठी काहीतरी योगदान देण्याच्या उददेशाने या शिबिरांमध्ये सहभागी होत असलेल्या डॉक्टरांच्या संवेदनशीलतेने अनेक गरीब रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचत आहेत. गेली सात वर्षे मी या शिबिरांमध्ये सहभागी होत असून पुढेही मी सहभाग घेत राहील आणि या पद्धतीने मी समाजाने माझ्यासाठी केलेल्या मदतीची परतफेड करू शकेल असे मला वाटते असे मत डी वाय पाटी ल रुग्णालयाचे सर्जन डॉ कैलास जवादे हे व्यक्त करतात. तसेच शासनाच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत अधिकाधिक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मतही ते व्यक्त करतात.
पुढील शिबीर दिनांक २२ ते २५ मार्च दरम्यान पालघर येथे होणार असून या शिबीराची तयारी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत सुरु आहे. राज्यभर भरवली जाणारी ही वैदयकीय व दंत शिबीरे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी शासनाचा अत्यंत उपयुक्त उपक्रम असुन त्याची माहिती स्थानिक पातळीवर आशा, अंगणवाडी सेविकांमार्फत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शहरी भागांत हजारो-लाखो रुपये खर्च करुन जे औषधोपचार, शस्त्रक्रिया होतात तया हया शिबीरांच्या माध्यमातुन मोफत होत असल्यामुळे अधिकाधिक रुग्णांनी त्यांचा लाभ घ्यायला हवा.
वैभव मोहन पाटील
Dhanyawaad
ReplyDelete