अवैध रेती उपसा व दगडखाणींवर अंकुश आणणे गरजेचे

अवैध रेतीचा उपसा व दगडखाणींमधुन बेकायदा उत्‍खनन या गोष्‍टी कमी अधिक फरकाने सर्वच ठिकाणी सुरु असतात. मात्र यामुळे निसर्गाची अपरिमीत हानी होत आहे व प्रदुषण पातळीतदेखील मोठया प्रमाणावर वाढ होते. स्‍थानिक प्रशासकीय यंत्रणांच्‍या पाठबळाशिवाय हे सर्व सुरु असेल हे म्‍हणणे थोडे धारिष्‍टयाचे ठरेल. अशा प्रकारची कामे करणारे ठेकेदार, दगडखाण मालक, कंत्राटदार, व्‍यावसायिक हे सर्व काही ‘मॅनेज’ करुनच या धंदयात उतरतात. त्‍यामुळे वर्षानुवर्षे बिनबोभाटपणे हे अवैध व्‍यवसाय सुरु आहेत. तसेच प्रामाणिकपणे काम करताना अशा अवैध व्‍यवसायांवर कारवाई करणा-या अधिका-यांवर हल्‍ले करण्‍याचेदेखील प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. त्‍यामुळे अशा समाजविघातक व्‍यावसायीकांची एक प्रकारची दहशतदेखील निर्माण झाली आहे ज्‍यामुळे कारवाईची हिंमत अपवादानेच होते. त्‍यामुळे जल, ध्‍वनी व हवेतील प्रदुषण वाढवणा-या अशा अवैध व्‍यवसायांवर अंकुश आणण्‍यासाठी मोठया प्रमाणावर प्रशासकीय मान‍सिकता बदलण्‍याची व तिला बळ देण्‍याची गरज आहे.       

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त