इलेक्ट्रिक वाहने काळाची गरज
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
दररोज हजारोंच्या संख्येने नोंदणी होणारी वाहने, त्याचा रस्ते वाहतुकीवर होत असलेला विपरीत परिणाम, इंधनाचे वाढते दर व प्रदूषणाची दाहक समस्या या पार्श्वभुमीवर वाहनविक्रीवर नियंत्रण व प्रदुषणरहित वाहनांच्या निर्मितीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच इंधनाला पर्यंत म्हणून इतर मार्ग अवलंबने गरजेचे बनलेय. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहने हा चांगला पर्याय ठरू शकतो. वाहनांमुळे होत असलेल्या ध्वनी व वायू प्रदूषणावरदेखील हा जालीम इलाज ठरेल. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत येत्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने इंधनावर चालणारी वाहने बंद करून इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यायला हवे. तसेच ही वाहने चार्जिंग करण्यासाठी पेट्रोल पंपाप्रमाणे चार्जिंग स्टेशनदेखील ठिकठिकाणी उपलब्ध व्हायला हवीत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आगामी काळात अधिकाधिक प्रमाणात होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना अंमलात आणल्यास त्याची उद्देश्यपूर्ती फार दूर नसेल. सध्याच्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांना देखील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये परावर्तित करण्यासाठी व्यवस्थापन केले गेल्यास त्याचा लाभ देशातील लाखो वाहनधारकांना होईल. थोडक्यात,इलेक्ट्रिक वाहने काळाची गरज असून त्या दृष्टीने उचलले जाणारे प्रत्येक पाऊल स्वागतार्ह असेल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment