या मालिकेतून कुठला बोध घ्यावा?
- Get link
- X
- Other Apps
पहिल्या सीझनमध्ये बहुचर्चित देवमाणूस ही मालिका झी मराठी वाहिनीवर पुन्हा सुरू झाली आहे. डझनभर खून करून पसार झालेला डॉ अजित देव उर्फ देवीसिंग पुन्हा त्याच गावात आपल्या पैशांच्या शोधात राजस्थानी वेशात परतला. मात्र आपले पैसे मातीमोल झाल्याचे कळल्यावर आपल्या पत्नीचा खून करत त्याने गावात पुन्हा एकदा तोच खुनी खेळ सुरू केला आहे. पैशासाठी बायकांना फसवणे व त्यांचे पैसे लुबाडणे हा एकमेव उद्देश ठेवून परतलेला हा डॉक्टर हुबेहूब देवीसिंगसारखाच असल्याने पोलिसांना अद्याप तो ओळखता का येत नाही याचे अप्रूप वाटते. इतके खून व लुबाडणूक करून जेलची हवा खाल्लेला हा आरोपी बिनबोभाट गावात लोकांचा मसीहा बनून फिरताना व पोलिसांना याचा मागमूस नसल्याचे दाखवताना मालिकेच्या निर्मात्यांना नक्की कुठला संदेश द्यायचा आहे हे अनाकलनीय आहे. मागील आठवड्यातील एका भागात तर कहर करत एका हॉटेलच्या रूममध्ये या डॉक्टरच्या खोलीत काही पोलिसांना थेट मद्यप्राशन करताना दाखवले. पोलिसांचे वारंवार हनन होत असलेल्या ह्या मालिकेतून प्रेक्षकांनी नक्की कुठला बोध घ्यावा?
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment