विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशात आणावे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विदयार्थी मायदेशी सुखरूप परत आणणे सरकारची जबाबदारी आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये भयावह परिस्थीती निर्माण झाली आहे. रशियाचे अंदाधुंद हल्ले सुरू असून कोणत्याही क्षणी रशिया युक्रेनवर ताबा मिळवेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले भारतीय विद्यार्थी प्रचंड तणावात व भीतीच्या सावटाखाली आहेत. खरेतर तेथील युद्धाची परिस्थिती सर्वांच्याच दृष्टीने अभूतपूर्व आहे. अशात विद्यार्थ्यांच्या मनावर काय आघात होत असतील याची कल्पना न केलेली बरी. एकीकडे जीव वाचवण्यासाठीची धडपड व दुसरीकडे शैक्षणिक आयुष्याचे नुकसान अशा दुहेरी कात्रीत तेथील भारतीय विद्यार्थी आहेत. त्यांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. हा विषय आज केंद्राच्या दृष्टीने प्राधान्याचा असायला हवा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment