अर्थसंकल्पाचे मूल्यमापन हवे

केंद्र सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्प घोषित करण्यात येतो. त्यात अनेक मोठमोठ्या घोषणा होतात. त्यातील अनेक घोषणा लोकांना भुरळ घालतात. अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर त्यावर काही दिवस अगदी चवीने मोठमोठ्या चर्चा घडतात. अनेक विद्वान त्यावर आपली मते मांडतात व त्यातील योजना विकासाला कशी नवी दिशा देतील हे सांगताना दिसतात. मात्र नंतर पुढे या अर्थसंकल्पाचे काय होते हे पाहण्यासाठी कुणालाही वेळ नसतो. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदींचा वर्षभरात लोकांच्या जीवनमानावर काय परिणाम झाला हे मात्र गुलदस्त्यातच राहते. पुढच्या वर्षी पुन्हा नवा अर्थसंकल्प व त्याच चर्चा. ही सर्वसाधारण परिस्थिती वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. त्यामुळे नवा अर्थसंकल्प सादर होत असताना मागील वर्षीच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण झाले पाहिजे, त्याचे फलित लोकांना कळायला हवे. लक्षावधी कोटींच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर काय परिणाम झाला याचा ऊहापोह करण्यात कुठल्याही राजकीय पक्षाला वेळ व रस नसतो. त्याच त्याच घोषणा नवी लेबल्स चिकटवून लोकांसमोर ठेवल्या जातात व चर्चेच्या गुऱ्हाळात विरून जातात. ही परिस्थिती बदलायला हवी. दरवर्षी अर्थसंकल्पाचे मूल्यमापन करणारी यंत्रणा सरकारजवळ असायला हवी ज्यातून अर्थसंकल्पाचा खरा 'मतितार्थ' लोकांना कळेल. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त