जलमार्गाचा नवी मुंबईकरांना काय उपयोग?
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
नवी मुंबई विमानतळ व औद्योगिकीकरणामुळे पनवेलच्या पुढेदेखील विस्तारत चाललेल्या तिसऱ्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा लोढा वास्तव्यास येत आहे. यात रोजगारासाठी मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. सध्या सर्वात स्वस्त व जलद वाहतुकीचा मार्ग म्हणून लोकल रेल्वे सेवेवर मोठा भार येत असून हार्बर मार्गावरील सकाळ सायंकाळच्या वेळी धावणाऱ्या लोकल्स प्रवाशांच्या तुडुंब गर्दीने भरून धावत आहेत. रस्ते मार्गाने प्रवास करण्यास लागणारा विलंब व इंधनभार तसेच लोकलगर्दी कमी करण्यासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेला जलमार्ग लोकांना न परवडणारा आहे. त्यामुळे जलमार्गाची फलनिष्पत्ती काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक बेलापूर ते मुंबईपर्यंतचा हा जलमार्ग प्रवाशांच्या दृष्टीने सर्वात सोयीस्कर व जलद मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर अधिक क्षमतेच्या प्रवाशी बोटी सुरू केल्यास त्याचा मोठा फायदा नवी मुंबईकरांना होईल तसेच लोकलवाहतुकीवरील भारदेखील हलका होईल. यासाठी जलवाहतूक करणाऱ्या एखाद्या खाजगी एजन्सीला देखील कमी प्रवासदराने वाहतूक करण्यास परवानगी देता येईल. सध्या येथील न परवडणारी जलवाहतूक पांढरा हत्ती ठरत आहे. त्यामुळे अधिकाधिक क्षमतेची प्रवाशी वाहतूक सुरू करून या जलमार्गाचा वास्तवात उपयोग नवी मुंबईकरांना करून घ्यावा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment