सिडकोतील भ्रष्टाचार दुर्दैवी

शहरांचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या सिडकोने आजवर नवी मुंबईसह राज्यातील इतर शहरांचीदेखील निर्मिती केली. नियोजनबद्ध आखणीमुळे सिडकोनिर्मित शहरे आज बकालतेकडे न जाता अत्यंत सुंदर, सुटसुटीत व अतिक्रमणमुक्त आहेत. मात्र शहरांची निर्मिती करताना जमीन संपादन व प्रकल्पग्रस्तांना मोबदला देताना दप्तर दिरंगाई व भ्रष्टचार यामुळे सिडको अनेकदा अडचणीतदेखील सापडली आहे. सिडको महामंडळ ही शासनाची एक उत्तम संकल्पना आहे मात्र काही मोजक्या स्वार्थी अधिकारी, कर्मचार्यांमुळे सिडकोची ओळख भ्रष्टाचाराचे कुरण अशी झाली आहे. उरणच्या एका जमीनमालकाला त्याच्या जमिनीचा मोबदला देताना कुचराई केली म्हणून कार्यालयातील साहित्य जप्त होण्याची वेळ सिडकोवर यावी यासारखे दुर्दैव नाही. मात्र निगरगट्ट प्रशासनाला याने काही फरक पडेल असे वाटत नाही. कारण भ्रष्ट्राचाराची ही पाळेमुळे खोलवर रुजलेली असल्याने कुठल्याही प्रकरणात 'स्वारस्य' दाखवल्याशिवाय फाईली न हलवण्याची परंपरा इतक्या सहजासहजी मोडीत निघेल याची सुतराम शक्यता नाही.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त